चिखकेफ-मारहाण आंदोलक आरोपींची संख्या वाढली

0
1592

कणकवली : दि ९ : हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक मारहाणप्रकरणी पूर्वीच्या १९ आरोपींव्यतिरिक्त आणखी १० आरोपींची नावे पोलिसांनी निश्चित केली आहेत. या गुन्ह्यात आता पोलिसांनी ३० आरोपी निश्चित केले आहेत. ४ जुलै रोजी हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक-मारहाण आणि गडनदीपुलाला दोरीने बांधून ठेवण्याच्या गुन्ह्याखाली आमदार नितेश राणे, स्वाभिमान युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड,पं स सदस्य मिलिंद मेस्त्री, बांधकाम सभापती संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापती मेघा गांगण, नगरसेवक अभि मुसळे, स्वाभिमान शहराध्यक्ष राकेश राणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, कन्झ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे,संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगांवकर आदी १९  आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वरील सर्व आंदोलकांची ५  दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने पोलिसांनीत्यांना आज कणकवली न्यायालयात हजर केले. या १९  आंदोलकांना हजर करतानाच अन्य ११  आंदोलक आरोपिंचाही रिमांड मध्ये उल्लेख केला आहे. राकेश परब, जावेद शेख, अजय गांगण, सुशील पारकर, सिद्धेश वालावलकर,समीर प्रभुगावकर, औदुंबर राणे, लवू परब, शामसुंदर दळवी, संजीवनी पवार या ११ आंदोलकांवर पोलिसांनी आरोप निश्चित केले आहेत.अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here