महिला सरपंचाला मिसकॉल देणे उपसरपंचाला पडले महागात

0
1540
मालवण : तालुक्यातील एका गावातील उपसरपंचाला महिला सरपंचाला रात्रीच्यावेळी फोन करणे चांगलेच महागात पडले. महिला सरपंचाच्या पतीने उपसरपंचाला घरी बोलवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत उपसरपंचाने राजीनामा दिला नाही तर गावातील महिलांना घेऊन बांगड्या भरू, असा इशारा त्या गावच्या माजी सरपंचाने दिला आहे.
मालवण तालुक्यातील मालवण-कसाल मार्गावरील एका गावात उपसरपंच महाशयांचा महिला सरपंचाच्या मोबाईलवर रात्रीच्यावेळी चुकून मिसकॉल गेला. यावेळी तिच्या पतीने संतप्त होत उपसरपंचाला घरी बोलावून जाब विचारत सरपंचाच्या ‘साक्षी’ने ‘बाळा’सारखे मारले. महिला सरपंचाला रात्रीच्या वेळी फोन केल्याबद्दल माजी सरपंच आक्रमक झाला असून महिलेला त्रास देणाऱ्या उपसरपंचाने माफी मागावी. तसेच तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा ग्रामसभेत काळ्याफिती लावून निषेध करून महिला सदस्य बांगड्याचा आहेर देतील, असे त्या माजी सरपंचाने ग्रामसेवकास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, तालुक्यात मिसकॉल देणारा तो उपसरपंच चर्चेचा विषय बनला आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.