हायवे ठेकेदार के सी सी बिल्डकॉनच्या कासार्डेतील आवारात धुमच्छक्री

0
710

कणकवली : दि १३ : गावठी कट्टा डोक्याला लावत ठार मारण्याची धमकी देत हायवे चौपदरीकरणचा ठेकेदार केसीसी बिल्डकॉन च्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तर केसीसी बिल्डकॉन च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोखंडी शिग आणि लाकडी बांबूने जीवघेणी मारहाण केल्याचा परस्परविरोधी गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहेकासार्डे दक्षिण गावठाण ते जांभूळवाडीच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील खड्यांमुळे आपली कार खालून घासल्याचा राग येत प्रथमेश उर्फ सनी रणजित पाताडे याने साथीदारांसह केसीसी बिल्डकॉन च्या कासार्डे येथील कॅम्प आवारात कार आणि जीपमधून घुसले. सनी पाताडे याने डोक्याला गावठी कट्टा लावत ठार मारण्याची धमकी दिली. सनिसह त्याच्या साथीदारांनी आतील रूममध्ये असलेल्या कामगारांना आणि वर्कशॉपमधील कामगारांना लोखंडी शिग, लाकडी दांड्याने मारहाण केली. मोबाईल फोडून हिसकावून नेले अशी फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. १२ जुलै रोजी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तर प्रेषित महाडिक याने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत स्वतःला आणि त्याच्या मित्राना केसीसी बिल्डकॉन च्या १० ते १२ कर्मचाऱ्यांनी लोखंडी शिग आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. आपल्या डोक्यावर लाकडी बांबूने जीवघेणी मारहाण केली त्यात माझे डोके फुटले असून १२ टाके पडले आहेत. दोन्ही बाजूच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान कणकवली डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह घटनास्थळी जात पाहणी केली. गुन्ह्यात वापरलेली कार आणि जीप ताब्यात घेतली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे करत आहेत

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here