फसवणुकीप्रकरणी आरोपी विजय रणसिंग याची जामिनावर मुक्तता

0
546

सावंतवाडी : दि १३ : शहरातील फिर्यादी तेजस गवळी याला नोकरीला लावतो असे सांगून दीड लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. आरोपी विजय रणसिंग याने आपण विभागीय सचिव शिक्षण विभाग या पदावर कामाला असून तुला नोकरीला लावतो असे सांगून फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी याची सावंतवाडी न्यायालयाने २५००० सशर्त जामिनावर मुक्तता केली. एप्रिल २०१९ मध्ये फिर्यादी तेजस गवळी याला आपण तुला नोकरीस लावतो असे सांगून त्याच्याकडून दीड लाख उकळून त्याची फसवणूक केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्यादीने भादंवि कलम 420, 465, 467, 470, 120 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता ३  दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती व त्यानंतर सदर आरोपी यास न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले होते. यानंतर सावंतवाडी न्यायालयाने२५००० जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड. सुभाष पणदूरकर व ऍड. अभिजित पणदूरकर यांनी काम पाहिले..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.