कोलझर गावच्या समस्या न सोडविल्यास ग्रामपंचायतीला घेराव : संजय देसाई

0
139

दोडामार्ग : दि.१९ : कोलझर ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या उगाडे कोळंबवाडीतील पावसामुळे स्ट्रीट लाईट ब्रॅकेट खराब झालेले आहेत. त्यामुळे वारंवार बल्प जातात तेव्हा बल्प व ब्रॅकेट बदलावेत. कोलझर गावातील अंतर्गत रस्त्यांना कठडे नसल्याने रस्ते वाहून जात आहेत. कोळंबवाडी ते टेंबवाडी या दोन वाड्याना जोडणारा टेंबवाडी नदीवरील लोखंडी साकवाला लागून असलेल्या पायऱ्या पूर्णतः खराब झालेल्या आहेत ते काँक्रीटने बांधकाम करून निर्धोक करण्यात याव्यात वरील समस्या येत्या आठ दिवसात ग्रुप ग्रामपंचायतने न सोडविल्यास कोलझर ग्रामस्थासमवेत ग्रामपंचायतीला घेराव घातला जाईल असा इशारा कोलझर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here