वैश्य समाज सावंतवाडीच्यावतीने रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव 

0
343
सावंतवाडी : दि १९ : वैश्य समाज सावंतवाडीच्यावतीने ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप या कार्यक्रमाच रविवार दि २१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ४ : ०० वाजता सावंतवाडी येथील वैश्य भवन हॉलमध्ये आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या शुभहस्ते व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी संभाषण कौशल्य तज्ञ शर्मन अकॅडमीचे सागर खानोलकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन वैश्य समाज सावंतवाडीचे सचिव चंद्रकांत शिरोडकर, अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी केलय.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.