फोंडाघाट चोरीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

0
378

कणकवली : दि २४ : फोंडाघाट खैराटवाडीतील स्वतःच्याच घरात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरणाऱ्या लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्या मुसक्या सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने आवळल्या. फोंडाघाट खैराटवाडी येथील पांडुरंग खरात यांचे घर फोडून घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 2 लाख 40 हजारांचा ऐवज चोराने लंपास केला होता. याबाबत पांडूरंग खरात यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार लक्ष्मण खरात याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल होता. दरम्यान चोरी केल्यानंतर लक्ष्मण ला 23 जुलै रोजी कर्जत येथे सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने पकडून कणकवली पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान चोरीस गेलेले सर्व दागिने खरात यांच्या घरातच सापडल्याची माहिती समोर येत आहे. फक्त रोख 16 हजारांची रक्कम घेत लक्ष्मणने पोबारा केला होता. त्यातील काही रक्कम लक्ष्मणने उधळली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.