सभापती सुजाता हळदिवे-राणे यांना मोबाईलवरून मारण्याची धमकी…!

0
374

कणकवली : दि. २५ : कणकवली पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे-राणे यांना अज्ञात मोबाईलवरून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली असून, सभापती हळदीवे-राणे यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
कणकवली पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सुजाता हळदिवे-राणे यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने कॉल केला होता. अज्ञात इसमाने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचे सांगत सदानंद आहे का अशी विचारणा केली. त्यानंतर अज्ञात इसमाने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. याबाबत पं. स. सभापति हळदिवे-राणे यांनी कणकवली पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.