वाघ तो वाघच… वाचवला तर पाहीजेच..!

0
1085

सिंधुदुर्ग : दि २९ : जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे एक लाख वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत. अवैध शिकार वाघाची हाडे, कातडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाम येथे मोठी मागणी आहे. मोठ्या आर्थिक फायद्यासाठी तस्करांची साखळी विणली गेली आहे.हा दिवस साजरा करताना या वाघोबांचे जंगलातील अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा घुमावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. जगात फक्त चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती आढळतात. जगातील एकूण वाघांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.