युवासेनेतर्फे कणकवलीत ६० नवीन मतदारांची नोंदणी…!

0
536

कणकवली : दि. ३० : तालुका युवासेनेच्या वतीने कणकवली कॉलेज येथे नवीन मतदार नोंदणी अभियान मंगळवारी राबविण्यात आले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून याप्रसंगी ६० युवक व युवतींनी मतदार नोंदणी केली.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे किंबहुना हा त्यांचा हक्क आहे. परंतु काही युवक युवती याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे थेट कॉलेज आवारात हे मतदार नोंदणी अभियान राबवून युवक युवतींची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे आता नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हकक बजावता येणार आहे असे युवासेना तालुका प्रमुख ललित घाडीगांवकर व शहर प्रमुख तेजस राणे यांनी यावेळी सांगितले. या अभियानाला कणकवली नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना शहर प्रमुख शेखर राणे, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही या अभियानाला शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश मुंज, युवासेना तालुका समनवयक सचिन पवार, प्रथमेश परब, ओंकार चव्हाण, रुपेश आमडोस्कर, अजित काणेकर, प्रतीक रासम व युवासैनिक उपस्थीत होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.