डी.एड ऑनलाईन प्रवेशासाठी विशेष फेरी

0
486

सिंधुदुर्गनगरी : दि. ३०: सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी प्रथमिक शिक्षक परविका (डी.एड.) प्रथम वर्षाच्या शासकिय कोट्यातील प्रवेश, विशेष फेरी द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. डी.एड प्रवेशाच्या तीन फेऱ्यानंतर ही शासकीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्यामुळे प्रवेशाची ही विशेष फेरी होणार आहे. सदर रिक्त जागा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर भरण्यात  येतील. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजीपर्यंत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन डॉ. पी.व्ही. जाधव, प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.