मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांचा सिंधुदुर्ग दौरा

0
274

सिंधुदुर्गनगरी : दि. ३० : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे हे दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९.१४ वा. सावंतवाडी रोड, रेल्वेस्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी कडे प्रयाण, सकाळी ९.३० वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव, सकाळी १०.४५ वा. शासकीय विश्रामगृह सावंतवाडी येथून बॅरिस्टर नाथ पै. सभागृह, नगर परिषद, सावंतवाडी कडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. बॅ. नाथ पै, सभागृह, सावंतवाडी येथे सावंतवाडी परिसरातील नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप, दुपारी १२.३० वा. सावंतवाडी हून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी२.०० वा. सागर विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव, दुपारी ३.०० वा. साई दरबार हॉल वेंगुर्ला येथे नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप, सायं.५.००  वा. वेंगुर्ला येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.