पराबवाडा सरपंचांचे ५० टक्के मानधन नवजात मुलींसाठी…!

0
625

वेंगुर्ला : दि. ०१ : लेक वाचवा लेक शिकवा ही शिकवण गावातील लोकांनी आचरणात आणावी यासाठी, तालुक्यातील परबवाडा सरपंच पप्पु परब यांनी नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या सरपंच मानधनामधुन आपले ५० टक्के मानधन गावातील जन्माला येणाऱ्या नवजात मुलींना देण्याचा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे परब यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत परबवाडा व दिवाणी न्यायालय वेंगुर्ला मधील विधी सेवा समिती यांच्या वतीने गुरुवारी (३१ जुलै) परबवाडा येथे लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार व त्यासंबंधी कायदा यांचे महिलांना मार्गदर्शन करण्यांत आले. यावेळी अॅड. श्री. जी. जी. टांककर, अॅड. चैतन्य दळवी. अॅड. अक्षदा राऊळ, सेवानिवृत्त शिक्षक का. हू. शेख. ग्रामपंचायत सदस्य संताेष सावंत, हेमंत गावडे, अर्चना परब, कृतिका साटेलकर, ग्लॅनेस फर्नांडिस, सखी पवार. ग्रामसेवक बाेडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, सी.आर.पी. गाैरी सावंत, अॅना डिसाेजा व महिला बचतगटातील महिल वर्ग. ग्रामस्थ, युवावर्ग उपस्थित हाेते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.