खांबाळे येथे रस्त्यावर कोसळले झाड; वैभववाडी-फोंडा वाहतूक अर्धा तास ठप्प

0
216

वैभववाडी : दि. ०२ : फोंडा-वैभववाडी मार्गावर खांबाळे दंड येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाड तोडून मार्ग सुरळीत केला. तालुक्यात आज सकाळी वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे खांबाळे दंड येथे सकाळी ११.३० वा रस्त्यावर झाड कोसळले.सुमारे अर्धा तास वैभववाडी फोंडा मार्गावरील वाहतूक बंद होती. वाहनांची दोन्ही बाजूने रांग लागली होती.अखेर वाहनचालकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात माहिती दिली. बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी झाड तोडून मार्ग मोकळा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here