शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : डॉ .वसंत शेकडे

0
404

कणकवली : दि. ०२ : केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. प्रत्येक भारतीय नागरिकाला सक्षम बनविण्यासाठी या योजना फार महत्त्वाच्या आहेत. देशातला प्रत्येक व्यक्ती सक्षम झाला तर देश सक्षम आणि महासत्ता होईल त्यासाठी अनुलोम सारख्या संस्था कार्य करीत आहेत असे प्रतिपादन फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत शेकडे यांनी केली ते फोंडाघाट महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागने आयोजित केलेल्या “युवा माहिती दुत” उपक्रमांतर्गत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अनुलोम संस्थेचे श्री. जितेंद्र चिकाेडी, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, प्रा. संतोष आखाडे, प्रा. रूपाली माने हजर होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. जितेंद्र चिकोडी म्हणाले की, माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने युवकांनी समाजासाठी वेळ देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठचा एनएसएस विभाग आणि अनुलोम संस्था हे सामाजिक बांधिलकीचे काम करत आहेत. युवक आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून “युवा माहिती दुत” अॅपद्वारे अनुलोम संस्था कार्य करत आहे. चिकोडी यांनी “युवा माहिती दुत” अॅपची माहिती देऊन या कार्यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. अनुलोम संस्था शासनाच्या योजना “युवा माहिती दुत” ॲपद्वारे द्वारे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करत असून दुर्बल घटकांना बळ प्राप्त होत आहे. विद्यार्थी, शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी अशा अनेक घटकांसाठी सरकार योजना राबविते आणि दुर्लक्षित समाज घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करते असे मौलिक मार्गदर्शन श्री. जितेंद्र चिकोडी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सूरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सताेष आखाडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.डॉ. सतीश कामत प्रा.डॉ. संतोष रायबोले प्रा.डॉ राजाराम पाटील प्रा. डॉ. देवराव ताडेराव प्रा.डॉ. डाफळे प्रा. मयुरी सावंत यांच्यासह एनएसएस विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे हा कार्यक्रम संपल्याबरोबर सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी युवा माहिती दूत हे ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून या योजनांचा प्रसार करण्याचे काम तात्काळ सुरू केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.