कणकवलीत हायवेवरील अतिक्रमण हटवले

0
245

कणकवली : दि.०३ : शहरातील हायवे चौपदरीकरणावरील अतिक्रमण आज हायवे प्राधिकरणाच्यावतीने हटविण्यात आले. हायवे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी पोलीस बंदोबस्तात आज दुपारी ही कारवाई केली.
कणकवली शहरातील हायवे चौपदरीकरणातील सर्व्हिस रोडवर व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा होत होता. हायवेच्या आर.ओ.डब्ल्यू.लाईनच्या आतील ही अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याबाबत संबंधितांना नोटीसही बजावण्यात आली होती.मात्र अतिक्रमण न हटविल्याने आज हायवे प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उचलला. हायवे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी तहसीलदार आर जे पवार यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात एसटी बस स्थानकापासून दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांनी लागलीच स्वतःचे साहित्य बाजूला करत हायवे प्राधिकरणला सहकार्य केले. गणेशोत्सव काळात व्यापाऱ्यानी वाहातून सुरळीत ठेवण्यासाठी आर ओ डब्ल्यू लाईनमध्ये अतिक्रमण न करता हायवे प्राधिकरणला सहकार्य करावे असे आवाहन हायवे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी केले. यापुढे अतिक्रमण झालेच तर हायवे प्राधिकरणाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल असे ओटवणेकर यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here