शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समितीचे धरणे 

0
600
सिंधुदुर्गनगरी : दि ३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे व शिक्षणासंबंधीचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत.संघटनेने या विविध प्रश्नांसंबंधी वेळोवेळी निवेदने देऊन चर्चा केली आहे.परंतु ती पूर्तता करण्याचे केवळ आश्वासन दिले जाते. शिक्षकांच्या काही समस्या तर अधिक जटील बनत चालल्या असून प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा सिंधुदुर्गच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.  कमी पटाच्या नावाखाली जि.प.शाळा बंद करू नयेत, आर.टी.ई.कायद्याच्या निकषानुसार वाडी वस्तीपासून प्राथमिक शाळा 1 किमी तर उच्च प्राथमिक शाळा 3 किमी परिसरात असावी असे निर्देश आहेत.सिंधुदुर्ग हा बहुतांशी डोंगराळ व वाडीवस्त्या विखुरलेला जिल्हा आहे.कमी पटाच्या नावाखाली येथील शाळा बंद केल्यास लहान मुलांना लांब अंतराच्या शाळेत जाण्यास पायपीट करावी लागेल.गोरगरीब पालकांची मुले या शाळांतून शिकत असल्याने या शाळा बंद केल्यास ही मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका संभवत आहे.तसेच सरसकट अशा शाळा बंद करणे म्हणजे आर.टी.ई.अधिनियमाची पायमल्ली ठरणार आहे.त्यामुळे या शाळा बंद करू नयेत.कर्मचारी/शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारीखलाच करावे असे शासन आदेश आहेत.परंतु सदर आदेश धाब्यावर बसवून दरमहा वेतन विलंबाने केले जात आहे.वेतन विलंब झाल्याने शिक्षकांना आर्थिक समस्या निर्माण होत असून बँकांच्या भरमसाठ दंडव्याजाला सामोरे जावे लागत आहे या साठी आज जिल्हा परिषदेच्या समोर धरणे  आंदोलन छेडण्यात आलें यावेळी  जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर,मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर,राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर,सुरेखा कदम,नितीन कदम,दिलीप कदम,शरद नारकर,शिक्षक नेते सुनिल चव्हाण आदि उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.