रत्नागिरी येथे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेची बैठक

0
339

रत्नागिरी : रत्नागिरितील शासकीय विश्रामगृह माळनाका येथे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण सघटनेची(NCPO) बैठक उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. या फसवणूकीपासून ग्राहकाला संरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी ग्राहक संघटीत झाला पाहिजे. विक्रेत्यांच्या संघटना असतात. त्यामुळे विक्रत्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आवाज उठवला जातो. मात्र तळागाळातील ग्राहकांचे संघटन नसल्याकारणाने त्या ग्राहकाची फसवणूक होते. ग्राहकाची फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती प्रत्येक नागरीकाला असणे आवश्यक आहे. याच्याच अनुषंगाने ग्राहक वर्गामध्ये कायद्याबाबत प्रबोधन करुन मोठी ग्राहक चळवळ निर्माण करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटन (NCPO) काम करणार असल्याची माहिती महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकृष्ण पंडीत यांनी दिली. या बैठकीवेळी रत्नागिरी जिल्ह्यात मोठी कार्यकारिणी करण्याबाबत ग्रामस्तरावर ग्राहक दूत नेमणुकीबाबत, कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच ग्राहक संरक्षण विषयाच्या अनुषंगाने अधिका-यांसमवेत ठिकठिकाणी कार्यशाळा आयोजित करुन ग्राहक वर्गाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीवेळी कोकण अध्यक्ष संजिव जोशी, जिल्हा संघटक अजय भिडे, रत्नागिरी शहर अध्यक्ष राजू भाटलेकर, संगमेश्वरचे सुरेश सप्रे यांच्यासह रणजित गद्रे, विवेक केळकर, पुष्कराज इंगवले, विवेक दामले, हेमंत अभ्यंकर, सागर रसाळ, विलास मुंडेकर, अनुराग पंडीत, सौ. संपदा कुलकर्णी, सौ.मृणाल जोशी, सौ.प्रतिक्षा ओक, सौ.दिपा कोलतेकर, डाॅ. सौ.विणा कानडे आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.