हिंसा के खिलाफ…मानवता की ओर निर्भय मॉर्निंग वॉक

0
464

मुंबई : दि १७ : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला येत्या 20 ऑगस्ट रोजी 6 वर्ष पूर्ण होतील. अजूनही त्यांच्या खूनाच्या सूत्रधाराचा तपास लागला नाही. शिवाय त्यांच्यानंतर झालेल्या कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम एम कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या आणि त्यानंतरही देशभरात चालू असणाऱ्या हिंसेच्या घटना यात वाढ होतच आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हा संदेश देत निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात येत आहे.मुंबईत 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता दहिसर पूर्व रेल्वे स्टेशन पासून ही निर्भय रॅली सुरू होईल व जरीमरी गार्डन येथे रॅलीची सांगता होईल. मुंबई जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील सर्व कार्यकर्ते व मानवतावादी नागरिकांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र अंनिसच्या दहिसर शाखेचे कार्याध्यक्ष अमित (8097439544) व प्रधान सचिव निशा (9922596158) यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.