संजू परब तुम्ही कार्य असेच सुरू ठेवा ; माझी काळजी करू नका : सतीश सावंत

0
1981

सावंतवाडी : दि १९ : संजू परब यांच्या वाढदिनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी विधानसभा मी लढवणार नाही, संजू तू माझी काळजी नको करू, रामेश्वर तुझ्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण करो, असा आशीर्वाद यावेळी सतीश सावंत यांनी संजू परब यांना दिला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीत पक्षवाढीसाठी मोठे कार्य  केले आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे.  त्यांंनी आपले हे कार्य असेच सुरू ठेवावे, माझी काळजी करू नये. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील कार्यालयात साजरा करताना सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर, माजी जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, संजू परब, संजना परब, महिला तालुकाध्यक्षा गीता परब, उपसभापती संदीप नेमळेकर, नगरपालिका गटनेते राजू बेग, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी सभापती रवी मडगावकर, सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबा म्हापसेकर, नगरसेविका दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, लोकसभा सरचिटणीस विशाल परब, अॅड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.