राणे पिता-पुत्र ‘वर्षा’वर…! ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट 

0
2742

मुंबई : दि २१ : महाराष्ट्र स्वाभिमान अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे वर्षा बंगल्यावर दाखल झाले. खासदार नारायण राणेंनी आमदार नितेश राणेंसह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र स्वाभाविमान पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबतचा निर्णय १० दिवसात जाहीर करणार अशी माहिती नारायण राणे यांनी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत दिली होती. दरम्यान, आज नारायण राणे यांनी नितेश राणेंसह वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात भूकंप होणार ? महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागल्यात.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.