जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन

0
398

सिंधुदुर्गनगरी : दि. २२ :  जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस सतत पडलेल्या सतंतधार पावसामुळे भात पिकाची वाढ थांबली असून त्यांचा उत्पादकता व उत्पादन यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्ता आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविण्यासाठी साठलेल्या पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा करून घेण्यासाठी शेतातील पाणी कमी करण्याचे प्रयत्न करावेत. वातावरणामध्ये उष्णता व दमटपणा वाढल्यामुळे भात पिकावर लष्करी अळीचा व निळे भुंगेरा किडिंचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. या किडीच्या अळ्या दिवसारोपाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पिकावर हल्ला करतात. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव आढळताच सायपमेथ्रीन २५ इ.सी. दहा लीटर पाण्यात ३ मी.ली. मिसळून सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा नसताना फवारणी करावी. तसचे अंडीपुंज आणि अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. भात कापणी नंतर खोल नांगरणी करावी. त्यामुळे सुप्त अवस्थेतील कोष नष्ट होतात. हळव्या जातीवर लोंबी तयार असताना प्रादुर्भाव झाला तर पीकांची त्वरीत कापणी करावी. तसेच शेतात १ ते २ दिवस पाणी बांधल्यास देखील या किडीचे नियंत्रण होते. तसेच भात खाचरात बेडकांचे सवंर्धन करावे. भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता एक ग्रॅम एडिफोनफोस(हिनोसान) किंवा १ ग्रॅम कार्बाडेझीम प्रति लिटर पाण्यातून फवारावे. योग्य ठिकाणी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. अधिक माहितीसाठी कृषिसहायक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.             सदर कार्यक्रम १०० टक्के यशस्वी होण्याकरिता कृषि विभागाला सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. अजित आडसुळे, उपविभागीय कृषि अधिकारी सावंतवाडी यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.