वाहतुकीचे नवे नियम लागू…!

0
362

मुंबई : दि.२८ : आता वाहन चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.वाहतुकीचे नियम बदलून नवे नियम लागू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे. वाहतुकीचे हे नियम मोडले तर जबर दंड होऊ शकतो. ड्रायव्हिंगचा परवाना हवा असेल तर त्यासाठीही काटेकोर निकष लावण्यात येणार आहेत. जर कुणी अल्पवयीन मुलाने किंवा मुलीने गाडी चालवताना अपघात घडला तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना ३ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होईल. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल. नव्या नियमांनुसार, आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही किंवा अपात्र असाताना गाडी चालवली तर १० हजार रुपये दंड होऊ शकतो. सीट बेल्ट लावला नाही तरीही मोठा दंड होईल. भरधाव वेगाने गाडी चालवली तर एक हजार रुपयापासून २ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विनातिकीट प्रवास केला तर ५००रु. दंड पडेल, अधिकाऱ्यांचा आदेश मानला नाही तर २ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल,  लायसन्स नसताना गाडी चालवली तर ५ हजार रुपयांचा दंड, अपात्र होऊन वाहन चालवल्यास १० हजार रु. दंड, भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांना १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे, धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं तर ५ हजार रुपयांचा दंड, दारू पिऊन गाडी चालवली तर १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, स्पीडिंग किंवा रेसिंग केलं तर ५ हजार रुपयांचा दंड आहे, परवाना नसताना वाहन चालवलं तर १० हजार रुपयांचा दंड, लायसन्सचे नियम तोडले तर २५ हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे, वाहनात जास्त सामान भरलं तर २ हजार रुपयांहून जास्त दंडाची तरतूद आहे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील तर एका पॅसेंडरला एक हजार रुपये असा दंड पडेल, सीटबेल्ट लावला नाही तर १ हजार रुपयांचा दंड आहे, स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्या तर २ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं, हेल्मेट घातलं नाही तर १ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी लायसन्स रद्द होण्याची शिक्षा, अँब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना रस्ता दिला नाही तर १० हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो, इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवलं तर २ हजार रुपयांचा दंड पडेल, अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात झाला तर त्यांच्या पालकांना दोषी ठरवलं जाईल, वाहनाची नोंदणीही रद्द होईल, अधिकाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.