कोकीसरे तंटामुक्ती अध्यक्षपदी भालचंद्र जाधव

0
229

वैभववाडी : दि. ०१ : कोकीसरे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र भिवा जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्यांची निवड करण्यात आली आहे.जाधव यांनी यापूर्वी महालक्ष्मी विकास सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदाचा सहा वर्षे कारभार संभाळला होता.सध्या त्या सोसायटीचे विद्यमान संचालक म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन गावकऱ्यांनी त्यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड केली आहे.गावच्या विकासासोबत एकोप्यासाठी काम करणार असल्याचे जाधव यांनी निवडीनंतर सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here