काश्मीरमधील पंच, सरपंचांना मिळणार दोन लाखांचे विमा सुरक्षा कवच

0
538

जम्मू काश्मीर : दि. ०३ : जम्मू-काश्मीरमधील पंचायत सदस्य आणि सरपंचांना पोलीस संरक्षण तसेच प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी काश्मीरमधील संरपच आणि पंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले. या शिष्टमंडळाने मंगळवारी अमित शाह यांची भेट घेतली.आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुरक्षा मागितल्यानंतर त्यांनी प्रशासनामार्फत सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती कुपवाडाचे सरपंच मीर जुनैद यांनी दिली. सरपंच आणि पंचायत सदस्याला प्रत्येकी दोन लाख रुपयाचे विमा सुरक्षा कवच देण्याचाही त्यांनी शब्द दिला आहे असे हरवानचे सरपंच झुबेर निशाद भट यांनी सांगितले. हरवान गाव श्रीनगर जिल्ह्यात आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.