बांदा टोलनाका परिसरातील अनधिकृत माती उत्खननाची कसून चौकशी करा : साईप्रसाद कल्याणकर

0
468

सावंतवाडी : दि १६ : बांदा टोलनाका उभारणी करिता केलेल्या माती उत्खनन प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी साई कल्याणकर यांनी केली आहे. ज्या ठिकाणी उत्खनन केले तेथील माती ही सर्वसामान्य प्रतीची नसून त्यात आहे इतर खनिजाचे प्रमाण जास्त असल्याने यामुळे माती उत्खननला यापूर्वी केलेला 349 कोटी दंडात वाढ होऊन 698 कोटी दंड करावा अशीही मागणी केली. टोलनाक्याला 32 एकर ची गरज नसल्याने अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत करा.याठिकाणी पर्यटन केंद्र उभारून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा नसल्याने ते उभारु नये. साई कल्याणकर हे बेकायदेशीर होणाऱ्या उत्खनन बाबत गेले कित्येक दिवस आवाज उठवत असून त्यांना अनधिकृत उत्खनन करणाऱ्या कम्पनी कडून कल्याणकर यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना सरकारने संरक्षण द्यावे तसेच यापूर्वी कल्याणकर यांचे सहकारी गडकरी यांचे अपघातात नाही तर त्यांचा मृत्यू म्हणजे घातपात असावा असा देऊलकर यांनी संशय व्यक्त केला.यावेळी डी के सावंत,नकुल पार्सेकर,श्रद्धा कल्याणकर,वैष्णवी कल्याणकर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here