तुमची स्वप्ने लवकरच साकार होवो.. ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अतुल रावराणे यांना वाढदिवसादिनी शुभेच्छा

0
557

सिंधुदुर्ग : दि १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते अतुल रावराणे यांना तुमच्या मनातील सर्व स्वप्ने लवकरच साकार होवो अशा शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा नेते अतुल रावराणे यांचा वाढदिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिर येथे साजरा करण्यात आला. महाजनादेश यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाची बैठक आज १८ सप्टेंबर रोजी सकाळी फिनोलेक्स रत्नागिरी येथे घेतली. या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अतुल रावराणे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देत वाढदिवस अभिष्टचिंतन केले.त्याचबरोबर अतुल रावराणे यांना तुमच्या मनातील स्वप्ने लवकरच साकार होवो अशा सदिच्छा दिल्या. उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही अतुल रावराणे याना शुभेच्छा दिल्या. अतुल रावराणे यांचे जुने मित्र आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनीही अतुल रावराणे याना शुभेच्छा दिल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, सुभाष मयेकर, संदेश पारकर यांच्यासह ,लक्ष्मण रावराणे, जयदेव कदम, संतोष किंजवडेकर, संदेश पटेल, प्रभाकर सावंत, भाई सावंत यांच्यासह बैठकीला उपस्थित जिल्ह्याभरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी अतुल रावराणे यांचे अभिष्टचिंतन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.