असा आहे आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९चा कार्यक्रम

0
705

मुंबई : नुकतीच आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू १६ जून २०१९ रोजी भिडणार आहेत. तर १४ जुलैला विश्वचषकाची अंतिम फेरी रंगणार आहे. दोन वर्षांपूर्वी ओव्हल मैदानावर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरासमोर आले होते. यावेळी १८० धावांनी पाकिस्तानने टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक असेल. मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात रविवारी १६ जून २०१९ रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. पुढच्या वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक होणार आहे. ३० मे २०१८ रोजी यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याने वर्ल्डकपचा शुभारंभ होईल. पाच जूनला द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना रंगणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.