कोकणाची जादू ..! ; काळी नाय प्रेमाची

0
688

सिंधुदुर्ग : दि.२७ : जादू हो विषय कोकणात जोरात चाल्लो हा..तेका कारण ठरला हा राजकारण्यांनी उधळलेली मुक्ताफळा…पण खरा सांगुचा तर कोकणी माणसान मायेन, प्रेमान आतापर्यंत सगळ्यांची मना जिंकल्यान. त्यामुळे कोणी कायय म्हणानेत कोकणात चलतली फक्त प्रेमाचीच जादू. आमचा कोकण तसा समृद्ध…माडबागायती, डोंगर दरे, ह्यो असो लांबच्या लांब पसरलेलो समुद्र. मोजक्याच शब्दात सांगूचा तर कसलीच म्हणान कमी नाय हा…आणि कोकणी माणूस…तेच्याबद्दल काय बोलाचा ? अगदी देवमाणूस…लोका जशी आमच्या कोकणार प्रेम करतत तशीच आमच्या मालवणी भाशेरय करतत. म्हणान वगीच नाय त्या टीव्हीवाल्यांनी सिरियली काढल्यांनी..ती आपली रात्रीस खेळ चाले मालिका निसता धुमशान घालता…ह्या सिरीयलीत  कोकण, कोकणी माणूस दाख्यलो हयपर्यंत ठीक हा पण तेच्यात देवदेवस्की, भूताखेता, करणी बाधा दाख्यली थय सगळी शिरा पडली. ह्या सगळा इतक्या लांबाट सांगतो तेका कारण वायच येगळा हा…तेचा काय, अगदी हल्लीच हा.. ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणा होते, दीपक केसरकर सिंधुदुर्गाचे एक नंबरचे जादुगार आसत. त्यांच्या जादूत्सुन कोनेक सुटाक नाय..ते असाय सांगी होते दीपक केसरकरांनी हात मिळायल्या पासून जो तेंका त्रास सुरु झालो तो आजुनय चालूच आसा. तेच्यार केसरकर काय वगी बसतत ? हि प्रेमाची जादू आसा म्हणान तेंच्यानी सगळो विषयच संपवन टाकलो.. हेच्यामुळेकाय झाला ? लोकांका आयातो विषयच मिळालो ना चघळूक. तेच्यात आणखीन मोठ्या पदावरची व्यक्ती असा बोलक लागली म्हटल्यार लोकांनी तर धसकोच घेतलो. खरोच कोकणात जादूटोणो व्हता की काय असाच वाटाक लागला. मगे कसा झाला ते सिरीयलवाले दाखय व्हते ता सगळा खराच कोकणात व्हता अशी चर्चा चालू झाली ना..कोणाकोणाची म्हणान तोंडा धरतलो आता. आसो ता सगळा रव्हानेत..खरीच अशीच खय जादू आसात तर एक काम करा. सध्या रस्त्याची चाळण झाली आसा ना तर ते जादून गुळगुळीत होतीत काय बघा…कारण आम्ही आता बांधकाम वाल्यांका सांगून कंठाळ॒ळो.बिचाऱ्या आमच्या कोकणातल्या पोरांका शिकाक आणि कमवक मूमैक जावाचा लागता, जादून हे सुदा प्रश्न मिटले असते तर बरा होता. आणि हा सगळ्यात मोठ्हो प्रश्न म्हणजे आरोग्याचो, शेवटी कसा जीव बरो तर सगळा बरा व्हय काय नाय… जादून ता भूमिपूजन केलेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बेगिन  बांधांना व्हयत तर बघा. ह्या इतक्यात काय करू नकोत हा.. आचारसंहिता लागली आसा. इतके दिस वाट बगली अजून वायचं बघू ..काय हरकत नाय…शेवटी कोकणी माणूस ना..सहनशीलता खूप आसा आमच्याकडे..निवडणूक झाल्यार वायच लक्षात ठेवन हे ढीग भरान  प्रश्न जरा निकाली लागले तर भरान पावात..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here