मालवणातील युवकाची गळफास लावून आत्महत्या

0
19099

मालवण : दि ३० : सत्यम नामदेव जाधव वय २१ साळेल जाधववाडी याने राहत्या घराच्या बाहेरील खोलीत लोखंडी शिगेला कापडी पट्टीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सत्यम याची मालवणमधील एका युवतीशी मैत्री होती. रविवारी दुपारी ती युवती साळेलला सत्यम याच्या घरी जेवायला आली होती. त्यानंतर सत्यमने तिला चौके येथे नेऊन सोडले होते. रात्री उशिराने युवतीचे नातेवाईक साळेल येऊन त्याला धमकी देऊन गेल्याचे वडील नामदेव जाधव यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे. सत्यम याने आत्महत्या केल्याची त्याच्या वडिलाच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केली..त्याची आई बाहेर कपडे धुवत होती. त्यानंतर वाडीतील महिलांनी धाव घेत गळफास लावलेली पट्टी कोयत्याने कापली.त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवाराने गर्दी केली होती.सत्यम याच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चत आई, वडील, भाऊ, काका, काकी, चुलत भाऊ, बहिण असा परिवार आहे. मालवण पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष शिवगण, राजन पाटील, विलास टेबुलकर, हर्षल खडपकर यांनी पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here