अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, ८ क्षेत्रांतल्या उद्योगांची मोठी घसरण

0
824

नवी दिल्ली : दि. ३० : भारताची अर्थव्यवस्था संकटात असताना आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. देशात ८ क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झाली आहे. कोळसा, कच्चं तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण कारखान्यांची उत्पादनं, खतं, पोलाद, सिमेंट आणि वीजपुरवठा या क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झालीय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही घसरण मोठी आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या उद्योगांची ४.७ टक्के वाढ होती. आता मात्र ही वाढ उणे ०.५ टक्के आहे. ही आकडेवारी सरकारनेच जाहीर केली आहे. कोळशामध्ये ८.६ टक्के, कच्चं तेल ५.४ टक्के, नैसर्गिक वायू ३.९ टक्के, सिमेंट ४.९ टक्के आणि वीजपुरवठा २.९ टक्के एवढी नकारात्मक वाढ झाली. असं असलं तरी खतं आणि पोलादाचं उत्पादन मात्र २.९ टक्के आणि ५ टक्क्यांनी वाढलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here