वेंगुर्ला शहर शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन…!

0
801

वेंगुर्ला : दि. ३० : वेंगुर्ला शहरातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेळाव्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सुरुवात झालीय. या मेळाव्याला तालुक्यातील सर्वात जास्त उपस्थिती वेंगुर्ला शहरात आहे. सुमारे ५०० कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित आहेत. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते  शिवबंधन बांधले. माजी नगरसेविका गीता अंधारी, मच्छिमार नेते भाई मालवणकर, विविध पक्षाचे कार्यकर्ते, गणेश गावडे, दत्तात्रय गावडे, गणेश गावडे, विनोद हुले, मोहन आडकर, शिपायान फर्नांडिस, भूषण फर्नांडिस, सुरज मोरजे, पुरुषोत्तम मालवणकर यांच्यासाहित अनेक युवकांनी तसेच महिलांचा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, सभापती सुनील मोरजकर, तालुकाप्रमुख बाळू परब, जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, बाळा दळवी, सचिन देसाई, महिला संघटक सुकन्या नरसुले, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, संदेश निकम, नगरसेवक सुमन निकम, शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, श्वेता हुले, शहर समन्वयक विवेक आरोलकर, शहर प्रमुख अजित राऊळ, युवासेना उपजिल्हा अधिकारी सागर नाणोस्कर, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, सचिन वालावलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, प्रकाश गडेकर आदी होते उपस्थित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here