सावंतवाडीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी भाजपच्या अन्नपूर्णा कोरगांवकर

0
638

सावंतवाडी : दि ९ : सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यावर प्रभारी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत नगराध्यक्ष असणार आहेत. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे नगराध्यक्ष पदाचा कारभार उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर सांभाळणार आहेत. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर त्या बसणार आहेत. त्या नगरपालिकेच्या अपक्ष नगरसेवक म्हणून विजयी होत्या. मात्र, भाजपचे काम सुरू ठेवले होते. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सौ.कोरगावकर यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग, मंदार कल्याणकर, शितल राऊळ आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here