बीएसएनएलच्या बंद नेटवर्कमूळे सिंधुदुर्गनगरीतील प्रशासकीय यंत्रणा ठप्प

0
721
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत दूर संचार निगमने आपले लाखो ग्राहक जोडले खरे, मात्र गेले कित्येक दिवस BSNL सेवेचा बोजवारा उडाला असून त्याचा फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून मोठं मोठ्या मशिनच्या सहाय्याने रस्ता खोदाई करण्याचे काम जोरदार सुरू आहे. या महामार्ग लगतच  BSNL ची केबल गेली असल्याने या कामात केबल तुटली जात आहे. मात्र या अगोदरच संपुर्ण भारतात कन्केटींंग नारा देणाऱ्या भारत दूर संचार निगमने यापूर्वीच यावर तोडगा का काढला नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या सर्वात जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या सर्व सामान्य जनतेला या नेटवर्कमुळे हेलपाटे मारावे लागतात. 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.