युवकांना रोजगाराची संधी मिळवून देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम २०१९

0
350

सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : शासनाने बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पद्‌धतीने अर्थसहाय्य देऊन स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन २०१९-२० पासून कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यात स्वयंरोजगारासाठी पूरक वातावरण तयार करणे, ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सदर योजनेसाठीच्या अटी पुढील प्रमाणे आहेत. राज्याचा स्थानिक अधिवास असावा, किमान १८ ते ४५ वय, विशेष प्रवर्गासाठी वयाची अट ५ वर्षांपर्यंत शिथील, रुपये १० लाख मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची अट नाही, १० लाख रुपयांवरील प्रकल्पासाठी किमान ७ वी पास व २५ लाख रुपयांच्यावरील प्रकल्पासाठी किमान १० वी पास, अर्जदाराने अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य, केंद्र शासनाच्या, महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा. प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल ५० लक्ष रुपये व सेवा, कृषि पूरक उद्योगांसाठी कमाल १० लाख रुपये मर्यादा आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी mshs-cmegp.gov.in हे विशेष पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे. संकेतस्थळावर पात्र अर्जदारांचे अर्ज अपलोड करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात मतद कक्ष सुरू करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.