वेंगुर्लेत ‘मी पुन्हा आलो’ च्या घोषणा

0
483

वेंगुर्ला : दि. २३ : भाजपा सरकार स्थापनेचा वेंगुर्ला भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यानी फटाके फोडत, लाडू वाटून जल्लोष केला तर भाजप कार्यालय ते हॉस्पिटल नाका पर्यंत रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय जनता पार्टीचा… विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जि प सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, शहरप्रमुख सुषमा प्रभूखानोलकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, वृंदा गवंडळकर, साईप्रसाद नाईक, दादा केळुस्कर, जीजी टांककर, गणपत केळुस्कर, रवींद्र मुंडये, महेश राणे, समीर घारे, संदीप कारंगूटकर, राधा सावंत, पपु परब, संतोष गावडे, कमलेश गावडे, राहुल गावडे, संदीप पाटील, प्रशांत खानोलकर, रवींद्र शिरसाट, भूषण सारंग, तुषार साळगावकर, सनी मोरे सहित भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here