आंब्रड जि.प.मतदार संघातून जान्हवी सावंत उमेदवारी अर्ज दाखल करणार

0
818

सिंधुदुर्गनगरी : दि २६ : कुडाळ तालुक्यातील आंब्रड जि.प.मतदार संघासाठी १२ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून उद्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी १०:३० वाजता शिवसेना पक्षाकडून महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघाची पोट निवडणूक जाहिर झाली आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ही निवडणूक लढविन्यासाठी २७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी शिवसेना पक्षाकडून महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत या सकाळी १०:३० वा आपला उमेदवारी अर्ज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.