आरवली वेतोबा जत्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी…!

0
575

वेंगुर्ले : दि. २७ : दक्षिण कोकणचा तिरुपती, जागृत देवस्थान वेंगुर्ला आरवली वेतोबाच्या जत्रोत्सवास भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे. मंदिरात धार्मिक विधी, देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे व दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यानंतर रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा, आकर्षक फटाक्यांची आतषबाजी व यानंतर दशावतारी नाटक संपन्न होणार आहे. आज जत्रोत्सवा निमित्त वेतोबाच्या दर्शनासाठी दशक्रोशीसह गोवा, बेळगाव, मुंबई, गुजराथ अशा विविध भागातील भाविकांनी सकाळपासून श्री वेतोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तर भाविकांच्या सेवेसाठी वेंगुर्ला एसटी आगारातून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर भाविकांची गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ला पोलीसांमार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.