निगुडे पाणीपुरवठा पाईपलाईनची तोडफोड ; अज्ञाता विरोधात तक्रार

0
519

बांदा : दि. ०२ : निगुडे शेर्ले रस्त्यालगत असलेले निगुडे ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजनेची पाईपलाईनचा एयर ऑल, एअर ऑल सिमेंट रिंग, मेन पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. याप्रकरणी निगुडे गावचे सरपंच श्री समीर गावडे व पोलीस पाटील श्रीमती सुचिता मयेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली याप्रकरणी सरपंच यांनी बांदा पोलीस स्टेशनमध्ये हे अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करणार आहे. हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे अशा व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचे पत्र बांदा पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.