भारतीय वैज्ञानिकांचा आदर्शवत वारसा पुढे चालवा : आ. वैभव नाईक

0
584

कुडाळ : दि ५ : सध्याच्या धावपळीच्या युगात पर्यावरण विषयक तसेच आरोग्य विषयक खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याविषयी विद्यार्थ्यांनी उपलब्ध नवनवीन तंत्राचा वापर करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भविष्याचा वेध घेणाऱ्या वैज्ञानिक प्रतिकृती तयार करा तसेच भारतीय वैज्ञानिकांचा आदर्शवत वारसा पुढे चालवा असे आवाहन कुडाळ तालुका आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण समारंभात कुडाळ येथे केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुका पंचायत समिती कुडाळ हायस्कूल कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूलने आपल्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त यजमान पद स्वीकारले होते यावेळी आमदार वैभव नाईक उपसभापती श्रिया परब ,पंचायत समिती सदस्य मधुरा राऊळ , गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी भोई गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे ,संस्था पदाधिकारी आनंद वैद्य अरविंद शिरसाट ,मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालावलकर ,नगरसेवक सचिन कळप, उपमुख्याध्यापक मनोहर गुरुवे स्काऊट गाईडच्या सचिव सुलभा देसाई, केंद्रप्रमुख उदय शिरोडकर ,उत्तम हरमलकर, चंद्रकांत तांबे ,पर्यवेक्षक विलास परब अनंत राणे आनंद नवार तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील विज्ञान शिक्षक विद्यार्थी वर्ग उपस्थित होते
यावेळी आमदार वैभव नाईक यांचा प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालावलकर तर संस्थेच्यावतीने आनंद वैद्य यांनी सत्कार केले यावेळी श्रेया परब, तृप्ती मेस्त्रीयांनी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल बागवे व मारुती गुंजाळ यांनी केले या विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालावलकर व पर्यवेक्षक विलास परब तसेच प्रशांत विज्ञान शिक्षकाने शिक्षकांनी व कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी केली कुडाळ विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेच्या संस्कार गोपाळ अणावकर याने बनविलेल्या भविष्यातील परिवहन प्रतिकृतीला तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात अथर्व राजेंद्र तेंडुलकर याने बनवलेल्या आपत्कालीन विमान लँडिंग या विज्ञान प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे उर्वरित निकाल माध्यमिक गट – गौरांग दिनेश तुळसकर तुळसुळी हाईस्कूल ३)भार्गव अतुल बागवे प्राथमिक कसाल बालवाडा माध्यमिक उच्च माध्यमिक- २)दीप बाळकृष्ण परब कुडाळ हायस्कूल ३)हर्षद संतोष पवार डिगस हायस्कूल गट तिसरा -प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य -१)मानसी श्रीकृष्ण सावंत प्राथमिक कुसबे २) उदय रमाकांत गोसावी वालावल पूर्व ३)दीपमाला प्रभाकर राऊळ ओरस बुद्रुक १ गट चौथा -माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य १)रुपेश गजानन कर्पे पणदूर हायस्कूल २) विद्यानंद अच्युत पिळणकर साळगव हायस्कूल ३) सहदेव चंद्रकांत भोई तुळसुळी हायस्कूल गट पाचवा -प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर शैक्षणिक साहित्य १) अतुल विजय उमळकर कुडाळ हायस्कूल कुडाळ २) सहदेव नारायण चव्हाण बॅरिस्टर नाथ पै कुडाळ ३) महादेव आप्पा न्हावेलकर माणगाव हायस्कूल वकृत्व स्पर्धा प्राथमिक गट  १)ओम जितेंद्र सामंत पाट हायस्कूल २) सानिया अनिल धर्णे कुडाळ हायस्कूल ३)काजल प्रमोद भोई माणगाव हायस्कूल वकृत्व स्पर्धा -माध्यमिक व उच्च माध्यमिक गट  १)शेपाली नारायण कशाळीकर कसाल हायस्कूल २) माधवी विश्वनाथ सावंत हीर्लोक हायस्कूल ३) वैष्णवी गोविंद येरागी पाट हायस्कूल निबंध स्पर्धा प्राथमिक गट १)अंकिता अरुण साळवी, गजानन विद्यालय पाट २) महती रवींद्र बुरूड पाट हायस्कूल ३)राधिका गणपत तेरसे कुडाळ हायस्कूल निबंध स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक गट १)दिपाली संतोष तांबे कुडाळ हायस्कूल २( केशव दिलीप राऊळ तुळसुली हायस्कूल ३)पल्लवी उदय खोत बॅरिस्टर नाथ पै कुडाळ प्रश्नमंजुषा प्राथमिक गट  १)मृदुला समीर शिरसाट व आर्या नरेंद्र गवंडे बॅरिस्टर नाथ पै कुडाळ २( सई मनीष धांडे व दिशा दशरथ करवडकर वालावल हायस्कूल३) पार्थ राघोजी परब व आनंदी सदानंद परब कसाल हायस्कूल प्रश्नमंजुषा माध्यमिक व उच्च माध्यमिक गट १) प्रणव रघुनाथ कामत व विराज गुरुराज कुलकर्णी कुडाळ हायस्कूल२) नेहा प्रल्हाद सावंत व मुकुंद महादेव कदम पणादुर हायस्कूल ३) प्रणिता प्रमोद कोनकर व धनश्री गोपाळ कविटकर चेंदवण हायस्कूल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.