क्रीडा सुविधा निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

0
451

सिंधुदुर्गनगरी : राज्यात दर्जेदार क्रीडा सुविधा निर्मिती करुन त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत या उद्देशाने राज्य शासनाने क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी व क्रीडा साहित्य खरेदीसाठी शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना राज्य स्तरावरून आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामध्ये क्रीडांगणे विकसित करणे, बंदिस्त प्रेक्षागृह उभारणे, क्रीडा सुविधा तयार करणे व विविध खेळांचे टिकाऊ व अटिकाऊ स्वरुपाचे साहित्य खरेदी करणे या बाबांकरिता विहीत मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येत.  सन २०१८-१९ या वर्षाकरिता पात्र शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, युवा मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेंतर्गत विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. १५ मे २०१८ पूर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोर्डवेकर यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.