काँग्रेसतर्फे अॅड. दिलीप नार्वेकर उद्या भरणार उमेदवारी अर्ज  : बाळासाहेब थोरात 

0
564
मुंबई : महाराष्ट्र काॅग्रेसच्या मुंबई गांधीभवन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला  प्रांताध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री बंटी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, कोकण प्रभारी राजन भोसले, माजी राज्यमंत्री  दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विकास सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, प्रांतिक सदस्य इरशाद शेख, जेष्ठ नेते वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दादा परब, अमोल सावंत आदी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाली. या संदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षातर्फे अॅड दिलीप नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर रोजी भरण्यात यावा यानंतर काँग्रेस पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीच्या संदर्भात तीनही पक्षांचे नेते अंतिम निर्णय घेतील अस थोरात म्हणाले,
अशी माहिती जिल्हा काँग्रेस सरचिटणीस  राजू मसुरकर यांनी दिली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.