सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डीच्या पुरुष अजिंक्य पदाचा मुकुट फोंडा पंचक्रोशी संघाकडे

0
606

सिंधुदुर्गनगरी : दि. ११ : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची वरिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे नुकतीच उत्साहात पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीच्या पुरुष अजिंक्य पदाचा मुकुट सलग दोन वेळा बलाढ्य फोंडा पंचक्रोशी संघाकडे तर सावंतवाडी हॉली क्रॉस संघाने महिला गटाच्या अजिंक्य पदाची हॅट्रिक केली आहे.  या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे बाबुराव चांदोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन कार्यवाह दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सहकार्यवाह तुषार साळगावकर व शैलेश नाईक, सदस्या लिविषा नाईक, निवड समिती प्रमुख महेश गावडे, तालुका प्रतिनिधी सुभाष धुरी ,नितिन हडकर, पंच प्रमुख सिताराम रेडकर ,ज्येष्ठ कबड्डी मार्गदर्शक मेस्त्री सर, माजी कबड्डी खेळाडू बबीता गवस, पंच मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माननीय श्री बाबुराव चांदोरे यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन  व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या वाटचालीबाबत आपले विचार मांडले. कबड्डी महर्षी बुवा साळवी हे दूरदृष्टी असणारे कबड्डी कार्यकर्ते होते आणि म्हणूनच त्यांनी माननीय शरद पवार व अजित दादा पवार यांना महाराष्ट्रातील कबड्डीच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रवाहात आणले. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या अध्यक्षपदाची धुरा सुद्धा बुवांनी सांभाळली होती व त्यांच्याच कालावधीत सिंधुदुर्गात गोल्ड कप चषक व राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील कबड्डी खेळाडू ना शिष्यवृत्त्या आणि थेट नोकऱ्या मिळवून देण्यासाठी राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित दादा पवार सतत प्रयत्नशील राहिले आहेत .सिंधुदुर्गातील कबड्डी खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर तसेच प्रो कबड्डी मध्ये आपल्या खेळाच्या जोरावर चमकावेत व जिल्ह्याचे नाव उज्वल करावे याकरिता राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनला केले जाईल असे आश्वासन माननीय चांदोरे यांनी याप्रसंगी दिले .माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना शासनाच्या खेळाडूंसाठी असणाऱ्या योजना व नोकरी मधील आरक्षण याबद्दल माहिती दिली व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने बीच कबड्डी व बीच व्हॉलीबॉल या खेळाचे आयोजन डिसेंबर अखेरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले जाणार आहे यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या जिल्ह्यातील यशस्वी वाटचालीबाबत त्यांनी संघटनेचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार राज्य पंच श्री किशोर पाताडे यांनी केले. या स्पर्धेत पुरुष गटात 16 संघांनी तर महिला गटात 8 संघानी सहभाग घेतला होता पुरुष गटात फोंडा पंचक्रोशी संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात रेवतळे मालवण संघावर मात करत सलग दोन वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डीचे अजिंक्यपद पटकावले. पुरुष गटात तृतीय क्रमांक यंगस्टार कणकवली संघाने मिळविला. संपूर्ण  स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू  फोंडा पंचक्रोशी  संघाच्या  अमित चव्हाण  व  उत्कृष्ट चढाई वीर  म्हणून  दीपक काळे  यांनी बहुमान मिळविला.  उत्कृष्ट पक्कड हा किताब रेवतळे मालवण संघाच्या ललित चव्हाण याने पटकावला . महिला गटात हॉली क्रॉस सावंतवाडी आणि एस एम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ यांच्यात झालेल्या रोमहर्षक अंतिम लढतीत सावंतवाडी होलीक्रोस संघाने विजय संपादन करून सिंधुदुर्ग महिला कबड्डी चे सलग तीन वेळा अजिंक्यपद पटकावून हॅट्रिक साधली. महिला गटात तृतीय क्रमांक शिवारा कणकवली संघाने मिळविला .महिला गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हॉली क्रॉस सावंतवाडी संघाची निकिता राऊत ,तर उत्कृष्ट चढाई वृषाली सावंत यांना हा बहुमान प्राप्त झाला .तर उत्कृष्ट पक्कड हा किताब एस एम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ संघाची सविता कावले हिने पटकावला. विजेत्या संघास आकर्षक फिरता चषक व कायमस्वरूपी चषक व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या संघास कायमस्वरूपी चषक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांकास गुणवत्ता प्रमाणपत्र व सहभागी सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मॅटवर झालेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व संघांची भोजन व्यवस्था संघटनेच्यावतीने विनामूल्य करण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनने  नियुक्त  केलेले स्पर्धा निरीक्षक  संजय पेडणेकर, तुषार साळगावकर, पंच प्रमुख श्री सिताराम रेडकर, पंच किशोर पाताडे, विश्राम नाईक, वैभव कोंडुसकर, आप्पा मुंज, संदीप सावंत, शैलेश नाईक, सागर पांगुळ, अमित गंगावणे, प्रथमेश सावंत ,अमोल मराठे ,महेश कदम, मधुकर पाटील, वैजंती नर, उमेश पाटकर, आदींनी महत्वपूर्ण योगदान दिले. निवड समिती प्रमुख म्हणून महेश गावडे ,तुषार साळगावकर ,संजय पेडणेकर यांनी प्रमुख जबाबदारी बजावली. पुरुष गटात एकूण २२ महिला गटात एकूण १४  खेळाडूंची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या पुरुष खेळाडूंचे सराव शिबिर मालवण येथे तर  महिला  खेळाडूंचे  सराव शिबिर  सावंतवाडी येथे दिनांक १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात मध्ये आहे. निवड झालेल्या खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ला करण्यात येणार आहे. पुरुष गट निवड यादी खालील प्रमाणे १)प्रथमेश साळकर. २) मकरंद पाटकर ३) संकेत घाडी ४) आनंद  नानचे ५) आदेश हळदणकर ६) भक्ती यश साळगावकर ७) उदय जाधव ८) संकेत शिंदे ९) निकेत पवार १०) सुमित नाईक ११) अविनाश रेवाडकर १२) रोहित जाधव १३) प्रतीक धुमाळ १४) सुरज घाडी १५) ललित चव्हाण १६) विकी नेवाळे १७) अक्षय पाटील १८) अनिकेत पारकर १९ ) स्वप्निल कोकरे २०) अमित चव्हाण २१) दीपक काळे २२) अभिजीत गोसावी.. महिला गट निवड यादी.. अलिस्का अल्मेडा , निकिता राऊत, रूपाली सावंत , संजना गाटे, सविता कावले, काजल नार्वेकर, शारदा वर्दम, मयुरी चव्हाण, लक्ष्मी के पी, समृद्धी भगत, रक्षा तळगावकर , तेजल कदम, संध्या सावंत, प्रज्ञा शेट्ये. निवड झालेल्या खेळाडूंनी सराव शिबिर व ऑनलाईन नोंदणीच्या बाबींकरिता कार्यवाह दिनेश चव्हाण यांच्याशी 9422434265 या क्रमांकावर संपर्क साधावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.