शालेय क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना प्रेरणादायी : शर्वाणी गावकर

0
285
सावंतवाडी : दि १६ : तळवणे येथे आजगाव प्रभागस्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार या महोत्सवाचा जि प सदस्य शर्वाणी गावकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी कला क्रीडा महोत्सव हे विद्यार्थ्यांमधील खेळाडू निर्माण होण्यासाठी मदत करतात तसेच ते प्रेरणादायी असतात असे गावकर म्हणाल्या. अशा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा,राज्यस्तरीय खेळाडू निर्माण व्हावे अशी आशा व्यक्त करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या महोस्त्वास उपसभापती संदीप नेमळेकर,सरपंच वैभवी विजय रेडकर, उपसरपंच समीर केरकर, आनंद रेडकर,केंद्रप्रमुख रावजी परब,वंदना परब,स्मिता नाईक,नारायण नाईक,आबा बर्डे,बाळा परब उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.