‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या कॅलेंडरचं आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन

0
403
सावंतवाडी : दि २८ : कोकणचं महाचॅनेल ‘ सिंधुदुर्ग लाईव्ह  ‘ च्या २०२० च्या कॅलेंडरचं आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आले.  सिंधुदुर्ग लाईव्हन या  कॅलेंडरच्या माध्यमातून वेळेचं महत्व मांडण्याचा एक चांगला प्रयत्न केला असल्याचे गौरोद्गार यावेळी आमदार नितेश राणे यांनी काढले. सिंधुदुर्ग लाईव्ह ने यावर्षी प्रथमच कॅलेंडर प्रकाशित केले आहे. यात कोकणातले उत्सव, सण, यात्रा-जत्रा यांची माहिती आहे. समाजातल्या सर्वच क्षेत्रातील घटकांना उपयुक्त असे हे कॅलेंडर आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.  आतापर्यंत ‘सिटी ऑन सायकल’ सारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवलेत. या कॅलेंडरचे प्रकाशन करून आम्हा सर्व राजकीय प्रतिनिधीना तसेच समाजाला वेळेचे आणि तारखेचे महत्व पटवून दिले. कारण वेळ ही जीवनातील अत्यंत महत्वाची बाब आहे. यापुढे देखील सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून अश्याप्रकाराचे नेहमीच उत्तोमोत्तम उपक्रम राबवण्यात यावेत, अशा शुभेच्छा आमदार नितेश राणे यांनी दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग  लाईव्हचे कार्यकारी संपादक सागर चव्हाण, न्यूज एडीटर अर्जुन धस्के, जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेवक सुनील बांदेकर, रेखा काणेकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.