जीवन पवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुन्हा राज्यात अव्वल !

0
432

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या विक्रीकर निरीक्षक (STI) परीक्षेत कराड (जि. सातारा) इथल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने दैदीप्यमान यश मिळवले. या स्पर्धा परीक्षा केंद्राचा विध्यार्थी बिपीन मोरे हा दिव्यांग ( PH) गटातून १२७ गुण मिळवून तर ग्रामीण भागातील विद्यार्थिनी शीतल येवले ११९ गुण मिळवून मागास (SC) गटात राज्यात प्रथम आले आहेत. या यशामुळे जीवन पवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने राज्यात प्रथम येण्याची मुलींची परंपरा अबाधित राखली आहे. वेळेचे अचूक नियोजन, कठोर परिश्रम आणि अनुभवी मार्गदर्शन हेच या यशाचे सूत्र आहे, असे या यशाबद्दल बोलताना केंद्राचे संचालक प्रा. जीवन पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.