पांडुरंग अनंतराव रावराणे यांची उद्या जयंती

0
270

वैभववाडी : दि. ०१ : कोल्हापूर शेतकरी सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पी ए राणे तथा पांडुरंग अनंतराव रावराणे यांची जयंती २ जानेवारीला  सकाळी ११ वाजता वैभववाडी येथे साजरी करण्यात येणार आहे. येथील शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात साजरी होणार य आहे.रावसाहेब पीए राणे हे मूळ नावळे गावचे रहिवासी असून ब्रिटिश काळात मामलेदार या पदावर कार्यरत होते. त्यांचे सामाजिक कार्य मोठे असून कोल्हापुरातील शेतकरी संघ गारगोटी येथील मौनी विद्यापीठ त्याचप्रमाणे इतर सामाजिक कार्यात त्याकाळात मोठा सहभाग घेतला होता.कोल्हापूर शेतकरी संघाला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांचं कार्य नवीन पिढीला माहीत व्हावे या उद्देशाने ही जयंती साजरी करण्यात येत आहे.तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी आत्मा समितीचे अध्यक्ष महेश रावराणे यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.