वेंगुर्ल्यात जागृती महोत्सवाला सुरवात…!

0
461

वेंगुर्ला : दि. ०५ : जागृती क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने जागृती फेस्टीव्हल अंतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तयरीय मॅरेथॉन स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलचा समीर वडर व सावंतवाडी कळसुलकर हायस्कुलची विद्यार्थीनी मधुरा वामन वाडकर वेगवान धावपटू ठरले. वेंगुर्ला-भटवाडी येथील जागृती क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे ४ जानेवारी रोजी मंडळाच्या ३१ व्यावर्षी जागृती फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील मॅरेथॉन स्पर्धा आज शनिवारी वेंगुर्ला-कॅम्प मैदान येथे पार पाडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४५५ विद्यार्थी खेळाडूंना सहभाग घेतला. या स्पर्धा विनोद कुळाळकर, बाळू कुडाळकर व सुनिल रेडकर यांनी पुरस्कृत केल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे क्रिडा शिक्षक जयराम वायंगणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांत जागृती मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल मालवणकर, सचिव अमोल सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख विवेक राणे, क्रिडा विभाग प्रमुख दिलीप मालवणकर, प्रशांत मालवणकर, क्रिडाशिक्षक विकास वाले, शशिकांत परब, शेखर साळगांवकर, विश्वास पवार, संजय पाटील, शंकर कोणेकर, बाळू खांबकर, सुनिल चव्हाण, विनायक वारंग, नवनाथ सातार्डेकर, महेंद्र घाडी, अपूर्वा परब, निकीता निनावे, डॉ.शशिकांत परब, क्रिडा प्रशिक्षक जया चुडनाईक, अक्षता मालवणकर यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून जयराम वायंगणकर, शेखर साळगांवकर, संजय पाटील, विकास वाले, विश्वास पवार, उल्हास तलवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा गटवार निकाल प्रथम पाच क्रमांकासह पुढीलप्रमाणे आहे. बालवाडी गट- (अंतर ५० मीटर) मुलगे- शौर्य शंकर मांजरेकर, देवेश भगवंत नवार, मनिष बाबाजी बागवे, सोहंम पांडुरंग मराठे, आहिल इब्राम शेख, मुली-दिया दिलीप मालवणकर, करीश्मा रामचंद्र प्रजापत, प्रतिक्षा शंकर घाडी, मनस्वी सुहास रेडेकर, सारा सचिन बागवे, पहिली ते दुसरी गट- (अंतर २०० मीटर) मुलगे- रोहित सिताराम साठे (एम.आर.देसाई स्कुल), नंदित नरेंद्र परब (वेंगुर्ला नं. ४), विराज संतोष जाधव (वेंगुर्ला नं. ४), चिन्मय दिपक माडकर (एम.आर.देसाई स्कुल), ऋषिकेश संतोष केरकर (एम.आर.देसाई स्कुल), मुली- चिन्मयी कौशिक मोर्जे (नवाबाग शाळा), मान्यता संदिप पेडणेकर (एम.आर.देसाई स्कुल), जायदा अब्दुल शेख (शिवाजी प्रागतीक शाळा), हंसिका जगन्नाथ वजराठकर (वेंगुर्ला नं. ४), अनन्या रमेश मोर्या (एम.आर.देसाई स्कुल), तिसरी-चौथी गट- (अंतर १ कि.मी.)-मुलगे- अरमान अबदुल शेख (शिवाजी प्रागतीक शाळा), तनिष गंगाराम धर्णे, चैतन्य हरी गवंडे (परबवाडा नं.१), तुषार सुर्यकांत परब (वजराठ शाळा), सोहंम सुर्यकांत परब (मठ नं.२), मुली- प्रांजल गुरूदास हुले (दाभोसशाळा), नयना दत्तात्रय भाटकर (परबवाडा शाळा), शमिका सचिन चिपकर (पडतेवाडी शाळा कुडाळ), दुर्वा महेश गांवकर (वेंगुर्ला नं. २), शिवाजी शेखर भगत (शिवाजी प्रागतीक शाळा), पाचवी ते सातवी गट- (अंतर २ कि.मी.) -मुलगे- श्रेयस दिपक काळसेकर (परबवाडा नं. १), जयेश रमेश सोनुर्लेकर (वेंगुर्ला हायस्कुल), प्रतिक संजय मालवणकर (वेंगुर्ल हायस्कुल), तुकाराम शंकर गावडे (मठ-कणकेवाडी), ओंकार महेश परूळेकर (मठ नं. २), मुली- वंदना सुनिल सावंत (वेंगुर्ला हायस्कुल), स्नेहा रंजन नार्वेकर (मदर तेरेसा), भावना भगवान पेडणेकर (वायंगणी-सुरंगपाणी शाळा), सानिया निवृत्ती पेडणेकर ( वायंगणी-सुरंगपाणी शाळा), जानवी सदानंद शारबिद्रे (वेंगुर्ला शाळा नं. १), आठवी ते दहावी गट (अंतर ४ किमी.)-मुलगे- समीर वडर (वेंगुर्ला हायस्कुल), सुजल गिरप, विशाल विठ्ठल भुते, विराज भुते तिन्ही (न्यू इंग्लीश स्कुल, उभादांडा), साहिल गजानन परब (तुळस हायस्कुल), मुली- मधुरा मोहन वाडकर (कळसुलकर हायस्कुल, सावंतवाडी), गायत्री राजाराम राणे (वेंगुर्ला हायस्कुल), भक्ती भगवान पेडणेकर (दाभोली हायस्कुल), साक्षी राजन पेडणेकर (तळवडे हायस्कुल), हिना गोविंद बागवे (वेंगुर्ला हायस्कुल) यांनी क्रमांक पटाकाविले. सदरची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जागृती क्रिडा मंडळाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी परीश्रम घेतले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.