सारस्वत बँकेच्या भरती संदर्भात आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मागर्दर्शन शिबीर

0
1705

कणकवली : दि ०५ : सारस्वत को ऑप. बँकेच्या मुंबई आणि पुणे शाखेत १०० कनिष्ठ अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे. कनिष्ठ अधिकारी-मार्केटिंग ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग) या पदाकरिता हि भरती असून वयोमर्यादा २७ वर्षा पेक्षा कमी व पदवी परीक्षेत किमान प्रथम वर्ग (फक्त बी कॉम, बीसीए, बी.ई . बीएमएस ) शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावयाचे असून २७ जानेवारी रोजी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या भरती परीक्षेत सहभागी व्हावे यासाठी परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा, तसेच विध्यार्थ्यांसाठी १० दिवसांचे मागर्दर्शन शिबीर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर १० जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते २ या वेळेत विजयराव नाईक फार्मसी कॉलेज (शिरवल ता कणकवली.) येथे होणार आहे.तज्ञ मार्गदर्शक या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. नव्याने स्थापन झालेल्या विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये आ. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न असून त्या दृष्टीकोनातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा. व अधिक माहितीसाठी ९४२११४८१२५, ९२०६१९४१९४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.