विद्यार्थ्यांनी मार्कवान होण्यापेक्षा गुणवान बनावे : तानाजी पाटील

0
632

सिंधुदुर्गनगरी : दि. १२ : आजच्या संगणक युगात फक्त परीक्षेत पास होऊन चालणार नाही ,तर परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आपल्या गरजेपुरताच करावा. प्रत्येक क्षेत्रात तज्ञ व्हा मार्कवान होण्यापेक्षा गुणवान व्हा असा मौलिक सल्ला वराड हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे मुख्याध्यापक व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक पतपेढी चे संचालक तानाजी पाटील यांनी दिला. कालिका शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला यावेळी व्यासपीठावर वराड हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, बिबवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश कुबल, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत , उपाध्यक्ष विठ्ठल पवार, संस्थेचे सचिव भूपतसेंन सावंत, डीगस हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक आळवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. अनुजा सावंत, शिक्षक संजय वेतूरेकर, शालेय मुख्यमंत्री अवधूत कुबल, सांस्कृतिक मंत्री हर्षद पवार आदी उपस्थित होते. यावेळी तानाजी पाटील बोलताना म्हणाले जीवनात शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण घेतलेले शिक्षण आपल्या गावाला राष्ट्राला उपयोगी आणावे ही भावना सतत मनात ठेवली पाहिजे. आजचे युग संगणकीय आहे फक्त पास होण्यासाठी परीक्षा देऊ नका तर परिपूर्ण होण्यासाठी ज्ञान मिळवा. जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रात तज्ञ व्हा. गुणवान होऊन नाव कमवा असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पावशी जि प सदस्य अमरसेंन सावंत म्हणाले आपला मेंदू हा संगणक आहे. याचा वापर आमची मुले फारच कमी करतात. तो जास्त करावा विद्यार्थ्यांना घडविणारी कार्यशाळा ही शाळा आहे असे आपण मानतो. आज-काल मुले इंटरनेटच्या माध्यमातून स्मार्टफोन मध्ये अडकत चालली आहेत यातून बाहेर यायला पाहिजे. शाळेत शिक्षक मुलावर चांगले संस्कार करत आहेत याचं बरोबर आपली मुले काय करतात हे देखील पालकांनी जबाबदारीने पाहिले पाहिजे असे सांगितले. बिबवणे हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रकाश कुबल म्हणाले ही संस्था माजी. आमदार पुष्पसेन सावंत चालवीत आहेत. त्यामुळे तुम्हाला मोठं पाठबळ आहे. संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या मनामध्ये शाळेबद्दल असलेली प्रखर निष्ठा, तळमळ, त्याग या सगळ्यांनी हे शैक्षणिक संकुल हा परिसर पुनीत झालेला आहे. शाळा आणि घर यामधील अवकाशामध्ये आज अनेक प्रलोभने आहेत. या प्रलोभनांच्या जाळ्यात विद्यार्थ्यांनो अडकू नका मनामध्ये निश्चित ध्येयाचे होकायंत्र ठेवून मार्ग क्रमण करा असे सांगितले. मुख्याध्यापक दीपक आळवे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व पटवून दिले. वाचनाला अधिक वेळ द्या स्वप्न उराशी बाळगा ते सत्यात उतरायला परिश्रम करा असे सांगितले तर शिक्षिका सौ. अनुजा सावंत म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक, पालक व संस्था चालक यांचे योगदान महत्त्वाचे असते. संस्थेतर्फे यापुढेही येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न राहणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रशाळेकडे वळावेत यासाठी गावातील प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे ही प्रशाला व शैक्षणिक संस्था आपण सर्वांनी वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे सांगितले व शाळेचा अहवाल वाचून दाखविला. अश्विनी वंजारे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी आपल्याला काय व्हायचे आहे ? त्यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदर करिअरची निवड करावी अशी संधी पुन्हा येत नाही मैदानी खेळ खेळा, शिक्षकांकडून प्रेरणा घ्या व व आपल्या शाळेचे नाव उज्वल करा असे सांगितले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. मुलांचे गुणदर्शन कार्यक्रम ही घेण्यात आले . त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिपक आळवे , सौ अनुजा सावंत, ऐ. व्ही. राणे, आर. व्ही. कांबळे , संजय वेतुरेकर, रामचंद्र घाडी,सौ,अस्विनी वंजारे, शिपाई संतोष गोसावी, प्रदीप वेतुरेकर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दीपक आळवे, यांनी केले तर सूत्रसंचालन संजय वेतुरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ऐ. व्ही. राणे यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.